
महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी राजकुमार बडोले यांनाच विजयी करा : सौ.वर्षाताई पटेल

गोंदिया प्रतिनिधि,
सड़क अर्जुनी:- निवडणुकीच्या पथ्यावर थापा मारणारे अनेक येणार आहेत. परंतु, खर्या अर्थाने गेल्या ५ वर्षात सर्वसामान्य कष्टकरी, शेतकरी, शेतमजुरांच्या पाठिशी उभे राहून धडाडीचे निर्णय महायुती सरकारने घेतले आहेत. त्याचबरोबर खा.प्रफुल पटेल या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी सातत्याने झटत आहेत. महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महायुती सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार राजकुमार बडोले यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहन सौ.वर्षाताई पटेल यांनी केले. महायुतीचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ सडक अर्जुनी तालुक्यातील श्री नंदकुमार पाटील काशिवार यांचा निवास स्थान, कोसमतोंडी येथे आयोजित सभेला संबोधित करताना सौ. वर्षाताई पटेल बोलत होत्या. येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठी तसेच शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे आणि महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी राजकुमार बडोले यांना विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मंचावर सौ. वर्षाताई पटेल, शारदा राजकुमार बड़ोले, अविनाश काशिवार, रजनीताई गिरिपुंजे, योगेंद्र भगत, शेषराव गिरिपुंजे, संगीताताई खोब्रागडे, वन्दनाताई डोंगरवार, सुधाताई राहंगडाले, छायाताई चौहान, निशाताई काशिवार, शितलताई गौड़, रजनीताई परिहार, लाडे ताई, भूमेश्वरीताई ऐड़े, कुन्दाताई काशिवार, चेतनाताई पटले, निर्मलाताई कापगते, रंजनाताई भोई, वर्षाताई सहारे, मुनेश्वर कापगते, डि यू राहंगडाले, मनोहर काशिवार, रमेश गहाने, केदार गौतम, विनोद काशिवार, शिव कापगते, मनोहर हेटी, सड़ा पाटिल कापगते, नानावरे धनोरी, भैयालाल पुसतोड़े, रमेश कापगते, अभिमान कापगते यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें