
विकासाच्या नविन पर्वाला आरंभ – महायुतीला साथ द्या – खा. प्रफुल पटेल

जिला प्रतिनिधि
गोंदिया:- आज नवेगावबांध जिल्हा गोंदिया येथे मोरगांव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार श्री राजकुमार बडोले यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व आर पी आय मित्र पक्षाच्या संयुक्त सभेला खासदार श्री प्रफुल पटेल उपस्थित होते.
जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळत असलेले श्री प्रफुल पटेल यांनी सभेला संबोधित केले. राज्यातील माता- बहिणींना अधिक सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी आमच्या सरकारने माझी लाडकी बहिण योजना लागू केली आहे. माझ्या भगिनींना निःशुल्क उच्च शिक्षण देऊन त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याची आमच्या सरकारने संकल्प केला आहे. महिलांना वर्षाला 3 सिलेंडर मुक्त देण्यात येणार आहे. सरकार शेतकऱ्यांना कृषीची वीज मोफत, युवा प्रशिक्षण च्या माध्यमातून विकासाचे नविन पर्व सुरु झाले आहे.
धान उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 20 हजार बोनस देण्याचे काम आमच्या सरकारने केले. यावर्षी 25 हजार बोनस देऊ, शेतकऱ्यांचा धान अल्पदरात विकावा लागू नये यासाठी नुकतेच धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. शेतकरी, महिला, युवा याचे भविष्य उज्ज्वल करण्यास सरकार कटिबध्द आहे विकसासाठी महायुतीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्या असे आवाहन श्री प्रफुल पटेल यांनी केले.
आपला परिसरातील मुख्य व्यवसाय शेती असून या भागात कृषी उत्पादनातून धान व्यतिरिक अनेक पिके घेतली जातात. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला कधी विज बिल भरणे शक्य होत नाही. त्यामुळे आमच्या सरकारने विज बिल माफ केले. नवेगाव बांध व आसपासच परीसर हा निसर्गानं नटलेला आहे. या भागात जगातील अनेक पक्षाचा वावर पाहायला मिळतो याभागाला अनेक पर्यटक व निसर्ग प्रेमी भेट देतात या निसर्गरम्य भागाचा कायापालट करायचा आहे. येथे सोयी सुविधा झाल्यास व्यवसायाला चालना मिळेल. या भागांतील मत्स्य व्यवसाय करणारे बांधवांच्या समस्या सोडायच्या आहेत. खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्त्वात या भागाचा विकास साध्य करायचे आहे यासाठी 20 तारखेला मतदान रुपी आपला आशीर्वाद मला द्या असे आवाहन श्री राजकुमार बडोले यांनी केले.
मेळाव्याला खा. श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री सुनील मेंढे, राजकुमार बडोले, यशवंत गणवीर, शेषराव गिरीपुंजे, किशोर तरोने, लोकपाल गहाणे, नामदेव डोंगरवार, चामेश्वर गहाणे, विजयाताई कापगते, नारायण डोंगरवार, रचना गहाणे, हर्ष मोदी, केवळराम पुस्तोडे, विजय रामटेके एकनाथ बारसागडे, प्रदीप मस्के, विजय कापगते, दयाराम लंजे, अनिषा पठाण, सुनिता जयस्वाल, भोजराम रहिले, रतीराम राणे, सुशीला हलमारे, आम्रपाली डोंगरवार, किशोर ब्राह्मणकर, चेतना कांबळे, निप्पल बरया, उद्धव मेहंदळे, रमण डोंगरवार, पिंटू निपाणी, गजानन डोंगरवार, जयंत लांजेवार, अण्णाजी डोंगरवार, नाजूक कुंभरे, राजू लाडे, प्रभू तागडे, सुनील भालाधरे, राजेश कठाणे, हर्षा राऊत, सहित मोठ्या संख्येने कार्यकर्ता उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें