
उपराजधानीत संपन्न झाला गझल मुशायरासालेकसा येथील कवयित्री किरणताई मोरे चव्हाण यांनी सुद्धा महिला अत्याचारावरील आपली गझल केली सादर

Reg. MSME- MH-11-0032298
सालेकसा तालुका प्रतिनिधि
🖊️ अमित सुरेश वैध
📲 7499237296
गोंदिया:-
सालेकसा:-मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानचे दुसरे विदर्भ लेखिका साहित्य संमेलन सेवादल महिला महाविद्यालय नागपूर येथे नुकतेच पार पडले या संमेलनाच्या आयोजन जेष्ठ साहित्यीका विजयाताई मारोतकर यांनी केले होते त्यावेळी महाराष्ट्रातील कवयित्रीने हजेरी लावली होती गजल मुशायरा सत्राच्या ऍड मंगलाताई नागरे यांच्या उपस्थित दहा गझलकारा यांनी आपल्या दमदार गझलेचे सादरीकरण करून सरस्वताना मंत्रमुग्ध केले त्यात सालेकसा येथील कवयित्री किरणताई मोरे चव्हाण यांनी सुद्धा महिला अत्याचारावरील आपली गझल सादर केली त्यावेळी संमेलनाच्या आयोजक विजयाताई मारोतकर यांनी त्यांचे विदर्भ लेखिका म्हणून सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला सोबतच डॉ सुशील मेश्राम संपादित बुध्दीझम आणि देहदान अवयवदान हे प्रबोधनपर पुस्तक ,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तेव्हाजेष्ठ साहित्यकार उषाकिरण आत्राम,निर्मला जीवने तसेच मोठ्या संख्येने विदर्भातील साहित्यिका हजर होत्या.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें