नगर परिषद हवेत अन अधिकारी झोपेत- पिंकेश शेंडे 

🖊️ अमित सुरेश वैध सालेकसा तालुका प्रतिनिधि
📲 7499237296

 (गोंदिया):- आमगाव नगर परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची अवस्था गंभीर असून, ३६ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, २३ ऑगस्ट २०२४ पासून वीज बिले न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे, ज्यामुळे या गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प आहे. थकित वीज बील आणि पाणीपट्टी मुळे बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. गावांवर सुमारे १०५ कोटी रुपयांची पाणीपट्टी थकित आहे,   ज्याची वसूली करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष मोहीम राबवावी लागणार आहे. त्याचबरोबर ४४ लाख रुपये वीज बिले थकित असल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज कनेक्शन खंडित केले आहे.नागरिकांची हालअपेष्टा आणि प्रशासनाची उदासीनता: या ठप्प पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या १५ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर चालत जावे लागत आहे. नागरिकांनी वन-वन करीत पाणी मिळवावे लागत आहे, ज्यामुळे त्यांची स्थिती खूपच दयनीय झाली आहे.

प्रशासकीय राजवट आणि अधिकार्‍यांची मनमानी:-
आमगाव नगरीत प्रशासकीय राजवट सुरू असून, अधिकार्‍यांनी आपली मनमानी सुरू केली आहे, असे पिंकेस शेंडे यांनी आरोप केले आहेत. नागरिकांचे पाणीप्रश्न अधिक बिकट होत चालले असून, प्रशासन आणि अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें


स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे
Donate Now
               
हमारे  नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट , और सभी खबरें डाउनलोड करें
डाउनलोड करें

जवाब जरूर दे 

महाराष्ट्र में किसकी बनेगी सरकार? विधानसभा चुनाव 2024

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129