
पोलीस स्टेशन सालेकसा महाआरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन!

गोंदिया जिल्ला प्रतिनिधि
🖊️ अमित सुरेश वैध
📲 7499237296
गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे दादालोरा खिडकी योजने अंतर्गत जिल्हयातील जनतेच्या हिताकरिता (विशेषतः मक्षलग्रस्त भागातील जनतेच्या कल्याणाकरिता) कायम अग्रेशर राहुन विविध कल्याणकारी नाविण्यपुर्ण उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येत असतात. त्याचाच एक भाग म्हणून मा. श्री गोरख भामरे साहेच, पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे संकल्पनेतुन तसेच मा. श्री अभय डोंगरे सा., अप्पर पोलीस अधिक्षक गोंदिया कॅम्प देवरी आणी मा. श्री. प्रमोद महामे सा., उपविभागिय पोलीस अधिकारी आमगांव यांच्या मार्गदर्शनाखाली नाविण्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत पोलीस स्टेशन सालेकसा भागातील सर्व नागरिक आणी पोलीस अधिकारी/ अंमलदार व त्यांचे कुटुंबिय यांचे करिता गोंदिया जिल्हा पोलीस दल व रोटरी क्लब ऑफ नागपुर, साऊथ ईस्ट सह आयोजक शालीनीताई मेधे हॉस्पीटल व रिसर्च सेंटर वानाडोंगरी, नागपुर यांचे संयुक्त विद्यमाने आज दिनांक ११/०८/२०२५ रोजी पोलीस स्टेशम सालेकसा अंतर्गत लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता आणी नाविण्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत सालेकसा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील गोर गरीब तसेच आदीवासी बांधवाचे आरोग्य निरोगी राहावे. पादृष्टीने पोलीस स्टेशन सालेकसा येथे निःशुल्क महाआरोग्य शिवीर व भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर पोलीस स्टेशन सालेकसा येथे आयोजित करण्यात आलेले भव्य आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर मध्ये दुर्गम/अतिदुर्गम भागातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेवुन एकुण ३९७ महीला पुरषांनी आरोग्य शिबीराचा लाभघेतला असून एकूण २५ पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. तसेच वैद्यकिय अधिकारी सांच्या सल्ल्याने पेशंट ला अधिक उपचाराकरिता रेफर करण्याची गरज आहे अशा पेशंट ला नागपुर बेबील डॉ. शालीनीताई मेधे हॉस्पीटल येथील अॅम्बुलेन्स व्दारे नेवुन मोफत उपचार करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रमाराला पोलीस स्टेशन सालेकसा पेचील पोलीस निरीक्षक भुषण बुराडे, व रोटरी क्लब ऑफ नागपुर साऊथ ईस्ट चे चेअरमन राजीव वरभे, डायरेक्टर प्रवीण ढोले, शालीनीताई मेथे हॉस्पीटल चे अॅडमीनीस्टेटीव्ह डॉ. अश्विन रडके असे प्रमुख पाहुने म्हणुन उपस्थित होते.
वरील कामगिरी पो.नि. भुषण बुराडे, पो.हवा. रितेश अग्नीहोत्री/१६८६, पो.शि. जितेन्द्र पगरवार/ २१५०, मपोशि कल्पना राहांगडाले/२०४८ तसेच नक्षल सेल गोंदिया येथील पो.ना. संजय कटरे/१७६९, चापोना उमेश गायचने/१९५२ यांनी यशस्वीरित्या पार पाडले असुन सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोशि भास्कर हरीणखेडे/२१४२ नक्षल प्रोपागंडा सेल गोंदिया यांनी केले!
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें