
शंकर मडावी यांच्या मुलाचा पुरात वाहून मृत्यू , मित्राच्या घरुन परत येताना घडला अपघात! जमाकुडो – कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेला।

शंकर मडावी यांच्या मुलाचा पुरात वाहून मृत्यू , मित्राच्या घरुन परत येताना घडला अपघात! जमाकुडो – कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्यात वाहून गेला।
जिला प्रतिनिधि दरेकसा
🖊️ अमित सुरेश वैध
(गोंदिया जिला) दरेकसा येथील रहिवासी माजी जिल्हा परिषद सदस्य व आदीवासी सेवक शंकरलाल मडावी यांचे चिरंजीव टिकेश मडावी (४५) यांचा जमाकुडो आणि कोपालगड दरम्यान वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना २३ जुलै च्या रात्री घडली आहे. २३ जुलैच्या सायंकाळी सालेकसा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला.
त्यामुळे सर्वत्र नाल्यांना मोठा पुर आला. दरम्यान सायंकाळी टिकेश मडावी हा कोपालगड येथील त्याचा मित्र दिनेश मडावी यांच्या घरी जेवण करायला गेला होता. मुसळधार पाऊस पडत असताना तो आपल्या मित्राच्या घरीच काही वेळ थांबून राहिला. रात्री दहाच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला. तेव्हा तो आपल्या स्कुटीने घरी परत येण्यासाठी निघाला . वाटेवर कोपालगड आणि तेलीटोला (जमाकुडो) दरम्यान वाहत असलेल्या नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असताना त्याने वाहत्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याचा वेग जास्त असल्यामुळे तो स्कुटी सह पुरात वाहून गेला. इकडे रात्री उशिरापर्यंत घरी पोहचला नाही म्हणून टिकेशच्या घरच्या लोकांनी त्याच्या मित्राच्या घरी कोपालगड येथे फोन केला. त्यांनी एक तासाआधीच घरी जाण्यासाठी निघून गेल्याचे सांगितले. तेव्हा वडील शंकरलाल मडावी आणि परिवातील लोक त्याचा शोध घेण्यासाठी निघाले. रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यावर पुलापासून दोन किलोमीटर अंतरावर टिकेश मडावी यांचा मृतदेहu सापडला.
सालेकसा पोलीसांनी घटनेची नोंद घेत मर्ग दाखल केला . सालेकसा येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. आपल्या मागे दोन मुलं आणि पत्नी आई-वडील आहेत
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें