
सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! शेतकरी, कष्टकरी, युवक, महिलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महायुतीला विजयी करा – माजी आमदार राजेंद्र जैन

गोंदिया प्रतिनिधि,
मोरगांव अर्जुनी वि.स. क्षेत्र:- आज हनुमान मंदीर समोरील पटांगण ग्राम खोडशिवणी येथे महायुतीचे उमेदवार श्री. राजकुमार बडोले यांच्या निवडणूक प्रचारार्थ महायुतीच्या मित्र पक्षाची संयुक्त जाहीर सभा माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. यावेळी श्री राजेंद्र जैन यांनी क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विकासासाठी खा. श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि समाजातील सर्व घटक यांना उज्ज्वल भविष्याकडे नेण्यासाठी महायुतीला मतदान करा अशी साद मतदारांना घालतांना माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिक्षण, आरोग्य सह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, धान उत्पादन शेतकऱ्यांना बोनस व मुक्त विज बिल, लाडकी बहिनीना आत्मनिर्भर करण्यासाठी, सिंचन, पर्यटन, विविध कल्याणकारी योजना, युवकांसाठी रोजगार निर्मिती करीता खा.श्री प्रफुल पटेलजी कटीबद्ध आहेत. सोबतच स्थानिक प्रश्नांना सोडविण्यासाठी या क्षेत्रांत हक्काचा आमदार असणे आवश्यक आहे.
त्यामूळे येणाऱ्या 20 तारखेला श्री. राजकुमार बडोले यांना मतदान करुन बहुमताने निवडूण द्या असे आवाहन करीत सत्तेसाठी आसुसलेल्या लोकांनी या क्षेत्रात पार्सल उमेदवार दिला आहे. त्यांचा पार्सल वापस करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी आहे असे संबोधन त्यांनी केले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, डॉ अविनाश काशिवार, गजानन परशुरामकर, हर्ष मोदी, भोला कापगते, संदिप मोदी, आस्तिक परशुरामकर, देवानंद वंजारी, प्रा. परशुरामकरजी, टेकराम परशुरामकर, महेश परशुरामकर, आशिष राऊत, अविनाश मेश्राम सहित मोठया संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
(ग्रामीण क्षमता न्यूज, यूट्यूब चैनल अवश्य देखें)
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें