
नवेगावबांध पोलिसांनी नाकाबंदी कारवाई करून ताब्यात घेतले सात जनावरांसह ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!

(न्यूज रिपोर्टर- सतीश वाघ)
गोंदिया : गोवंशीय जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जात असलेल्या दोन गो-तस्करांना नवेगावबांध पोलिसांनी नाकाबंदी कारवाई करून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सात जनावरांसह ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नरेंद्र तांडेकर (३८) व आशीष कोल्हे (२२) अशी दोन्ही गो-तस्करांची नावे आहे.
जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतुन दोघेजण पिकअप वाहनातून अवैध जनावरांची वाहतूक करून कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची गुप्त माहिती नवेगावबांध पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर नवेगावबांध पोलीसांनी (दि. ३ सेप्टेंबर) रात्री ११ वाजताच्या सुमारास नवेगावबांध ते धाबेपवनी मार्गावर सापळा रचून नाकाबंदी कारवाई केली. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा बोलेरो पिकअप मालवाहु वाहनास थांबवुन तपासणी केली असता आरोपी नरेंद्र तांडेकर व आशीष कोल्हे हे दोघेही वाहनात ७ गोवंश जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे कोंबून वाहतूक करत असल्याचे दिसून आले. दरम्यान दोघांना सदर जनावरांबाबत विचारपूस केली असता अवैधरित्या कत्तलीकरिता वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिसांनी वाहन व पशुधन असा ६ लक्ष ८० हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून ७ जनावरांची सुटका केली. दोन्ही आरोपींच्या विरोधात नवेगावबांध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें