
महाराष्ट्रात डबल इंजन सरकार, ग्रामपंचायत जवाबदार असून दुर्लक्षामुळे वार्ड क्रमांक 2 आणि 3 चा रस्ता चिखलात – नागरिक त्रस्त.

अमित वैधे दरेकसा मार्फत, 05 Jul 2025
सालेकसा:- मोदीजी चे 11 वर्ष विकासाचे अमृतकाल चालत असून अशी माहिती समोर येन व ग्रामीण क्षेत्रा कडे आमदार संजय पुराम के लक्ष्य वेधन गरजेचे आहे. सालेकसा तालुक्यातील
ग्रामपंचायत जमाकुडो अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक 2 आणि 3मधील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून पावसाळ्यात या रस्त्यांवरून चालणे देखील मुश्कील झाले आहे. या भागातील शाळकरी मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांची ही अवस्था नवीन नसून गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी केल्या आहेत. तरी देखील माजी सरपंच तसेच सध्याच्या सरपंच नूतनताई सोनवाने, उपसरपंच चुन्नीलाल राऊत, तसेच वार्ड क्रमांक 2चे सदस्य मनोज बोहने, छायाताई मशराम, भारतीताई मोहबे आणि वार्ड क्रमांक 3चे सदस्य विनोद नेवारे, अस्विनीताई शेंडे यांनी याबाबत कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत.
जिल्हा परिषद सदस्या गीताताई लिल्हारे आणि पंचायत समिती सदस्या सुनिताताई राऊत यांनाही या समस्येबाबत माहिती असूनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
“रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणे देखील अशक्य बनले आहे. काही ठिकाणी चिखलात बुडून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत,” असे रहिवाशांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या वारंवार दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी लवकरात लवकर या रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
“हा रस्ता नव्हे तर नागरिकांच्या सहनशक्तीची परीक्षा आहे. ग्रामपंचायतीने वारंवार नागरिकांच्या विनंतीकडे केलेलं दुर्लक्ष हे पूर्णपणे अक्षम्य आहे. शाळकरी मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या चिखलाच्या दलदलीतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, ही बाब प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचे लक्षण आहे.”
शिवसेना व युवासेना या समस्येचा तीव्र निषेध करतात आणि ग्रामपंचायत जमाकुडो, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांना चेतावणी देतात की त्यांनी तात्काळ या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू करावे. अन्यथा युवासेना या रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल आणि जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें