
ज्ञानाने प्रगती आणि शिक्षणाने परिवर्तन घडते -पूर्व आमदार राजेंद्र जैन

Reg. MSME- MH-11-0032298
प्रतिनिधि- मिथुन गजभिए, गोंदिया
गोंदिया:- गोंदिया शैक्षणिक संस्थेद्वारे संचालित जी.ई.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय दासगाव बु. येथील 53 व्या वार्षिकोउत्सव “आविष्कार” च्या उदघाटन सोहळा माजी आमदार तथा गोंदिया शैक्षण संस्थेचे सचिव मा.राजेंद्र जैन यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. तीन दिवसीय वार्षिक स्नेह संमेलनात विज्ञान प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक स्पर्धा, गीतगायन स्पर्धा, क्रिडा स्पर्धा या माध्यमातून विद्यार्थी आपली कला व प्रतिभा सादर करतील.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे काम शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेलजी यांनी केले आहे. गोंदिया शैक्षण संस्थेच्या माध्यमातून दोन्ही जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने चालवले जात आहे. याकरिता खासदार श्री.प्रफुल्ल पटेलजी व अध्यक्षा सौ.वर्षाताई पटेल हे नेहमी प्रयत्नशील असतात असे उद्गार माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना माजी आमदार श्री.राजेंद्र जैन पुढे म्हणाले, आजच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. परिश्रम आणि झोकून देऊन कोणतेही ध्येय गाठता येते आणि प्रत्येक व्यक्तीला जीवनात आपले ध्येय गाठून यशाच्या मार्गावर पोहोचायचे असते, माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे, शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.
कार्यक्रमात सर्वश्री राजेंद्र जैन, वैभव पवार, गोविंद तुरकर, राणूताई तुरकर, तुळशी ताईबोहणे, प्रियाताई हरिणखेडे, प्रकाश बरैया, सुनील पटले, योगेश बिसेन, विश्वनाथ चौधरी, दिनेश तुरकर, सतीश दमाहे, गीताताई उईके, मिथुन गजभिये (अध्यक्ष विमुस तेड़वा ), प्राचार्य डी.एल. पारधी, प्रेम बसेने व इतर शिक्षक,कर्मचारीगण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें