पोलीस स्टेशन सालेकसा येथे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव व ठाणेदार पोलीस स्टेशन सालेकसा यांचे उपस्थितीत रक्तदान शिबीर
Reg. MSME- MH-11-0032298
सालेकसा तालुका प्रतिनिधि
गोंदिया:- दिनांक २६/११/२०२४ रोजी संविधान दिवस निमित्त तसेच मुंबई शहर येथे आंतकवाद हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी/अंमलदार व नागरिक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोंदिया जिल्हा पोलीस दल, कल्पतरु बहुउद्देशिय संस्था, लोकमान्य ब्लड सेंटर गोंदिया व एचडीएफसी बैंक, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने लोक कल्याण कार्यास सहकार्य करण्याकरिता दिनांक २६/११/२०२४ रोजी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० वा. पर्यंत पोलीस स्टेशन सालेकसा येथे मा.उपविभागीय पोलीस अधिकारी आमगाव व ठाणेदार पोलीस स्टेशन सालेकसा यांचे उपस्थितीत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरामध्ये ८२ अमंलदार व नागरीकानी रक्तदान केले.
सदर शिबीर मा. पोलीस अधीक्षक गोंदिया, मा. श्री गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, डी.वाय.एस.पी प्रमोद मडामे, आमगाव पोलिस उप विभाग यांचे निर्देश मार्गदर्शनाखाली घेण्यात आले.