माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही
Reg. MSME- MH-11-0032298
मुंबई प्रतिनिधि
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलंय.
न्यायमूर्ती चांदीवाल यांनी काय म्हटले –
-मी क्लिनचीट दिली नाही , परमबीरसिंग यांनी केस मधून माघार घेतली त्यावर मी टिका केली आहे .
-सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती, अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं.
फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही
– चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिपण्णी.
– वाझे, परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली अशा आशयाचा चांदिवाल यांची प्रतिक्रिया आहे
– तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं , साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले.
– अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे.