
पोवार ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. ची निवडणूक बिनविरोध संपन्न

गोंदिया:- (न्यूज न्यूज रिपोर्टर- सतीश वाघ,गोरेगाव):- मागील काही दिवसापूर्वी गोरेगाव येथील प्रसिद्ध व प्रतिष्ठित श्री पोवार ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. गोरेगाव जिल्हा गोंदिया या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. तेव्हा पासून पोवार समाजामध्ये मोठ्या थाटामाटाने विविध ग्रुप आपआपली पॅनल तयार करून उमेदवार शोधणे व निवडणूक लढवणे तसेच आपली पॅनल निवडून आणण्याच्या तयारीत लागले होते. या कारणाने पोवार समाजाचे वातावरण चांगलेच तापले होते व सर्व उमेदवार परस्पर आपआपल्या तयारीत लागले होते. फक्त 12 संचालक पदासाठी 30 पेक्षा जास्त उमेदवारांनी फॉर्म भरल्यामुळे निवडणूक नक्कीच होणार होती व समाजाच्या एकोप्याला गोळबोट लागण्याचा प्रसंग आला होता पण सहकार महर्षी रेखलालभाऊ टेंभरे यांनी सर्व समाज बांधव व सर्व पॅनलचे उमेदवार यांची संयुक्त बैठक बोलावली. व सर्व पॅनल प्रमुख व उमेदवारांची मनधरणी करत उत्तम समन्वयाने व सगळ्यांच्या मर्जीने कोणालाही नाखुश न करता आपल्या हसऱ्या व मनमिळावू स्वभावाने श्री पोवार ग्रामीण बिगर शेती सह. पत संस्था मर्या. गोरेगाव ची निवडणूक बिनविरोध घडवून आणली. व विनम्र स्वभाव आणि कुशल व्यवहाराने वक्ती यशस्वी होतो ही म्हण रेखलालभाऊ टेंभरे यांनी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवली. त्यांच्या कौशल्याची व समन्वयाची सर्व समाजात स्तुती होत आहे. व समाजात होणारा भेद टाळल्याबद्दल समाज बांधवांनी आभार मानले आहे.
आजपर्यंतच्या राजकीय परिस्थितीत व इतिहासात ही पहिलीच घटना असेल की निवडणूक लढणाऱ्या सर्व पॅनलच्या नेते व उमेदवारांनी रेखलालभाऊ टेंभरे यांच्यावर विश्वास दाखवत सर्वच उमेदवारांनी आपले विड्रॉल फॉर्म सही करून रेखलालभाऊ टेंभरे यांच्या कार्यालयात जमा केले. व त्यापैकी टेंभरे यांनी आपल्या समन्वयातून 12 उमेदवार संचालक म्हणून निवड केली. त्यांनी डोमाजी बोपचे सोनी, राजेंद्र पटले गोरेगाव, निलकंठ बोपचे म्हसगांव, नामदेव रहांगडाले गोरेगाव, ख्रिचंदजी येळे गोरेगाव, डॉ एल. एस. तुरकर पुरगांव, राहुल कटरे गोरेगाव, डी. एस. बिसेन सर गोरेगाव, लालचंद धानगाये गोरेगाव, सौ. लताबाई टेंभरे कटंगी, सौ. भोजवंताबाई पटले सोनी, सौ. मोहनाबाई मोहनकर गोरेगाव यांना संचालक म्हणून निवडले. व संस्थेचे व उमेदवारांचे होणाऱ्या पैशाची नासधूस थांबवत निवडणूक निर्विरोध संपन्न केली. नंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांची निवड सुद्धा रेखलालभाऊ टेंभरे यांच्या कार्यालयातच पार पडली. त्यातही सर्व निवडून आलेल्या संचालकांनी एकमताने विश्वास दाखवत रेखलालभाऊ टेंभरे यांना नावे सुचवून सर्व पदासाठी नावे घेण्याची विनंती केली. रेखलालभाऊ टेंभरे यांनी अध्यक्ष राजेंद्र पटले गोरेगाव, उपाध्यक्ष निलकंठ बोपचे म्हसगांव, सचिव नामदेव रहांगडाले गोरेगाव यांचे नाव सुचवले व सर्व नवनिर्वाचित संचालकांनी सहमती दिली. व अशाप्रकारे रेखलालभाऊ टेंभरे यांच्या मार्गदर्शनात सर्वांनी श्री पोवार ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थां मर्या. गोरेगाव चे पदभार सांभाळले. आजच्या युगात भाऊ भावाचा होत नाही पण टेंभरे यांच्या नेतृत्वाखाली वरील निवडणूक यशस्वी पार पडली याचा सर्वत्र कुतुहल होत आहे हे विशेष.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें