
साकोली सभेत खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना देण्याचा आमचा वादा आहे.

Reg. MSME- MH-11-0032298
गोंदिया प्रतिनिधि,
साकोली:- आज विविध सेवा सहकारी संस्थेचे पटांगण, ग्राम विर्शी ता. साकोली येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत साकोली विधानसभा निर्वाचन क्षेत्राच्या महायुतीच्या उमेदवार श्री अविनाश ब्राह्मणकर यांच्या प्रचारार्थ संयुक्त सभेला संबोधित केले. यावेळी संबंधित करताना खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की यावर्षी सुध्दा हेक्टरी 25 हजार रुपये बोनस शेतकऱ्यांना देण्याचा आमचा वादा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी साखर कारखाना पुन्हा सुरु करण्यात आला. यामुळे शेतकरी व शेतमजूर, युवक यांना रोजगार मिळणार आहे. साकोली विधानसभा क्षेत्राच्या विकास करायचा असेल तर महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणा या क्षेत्राची विकासाची जिम्मेदारी मी घेण्यास तयार आहे. सभेला श्री प्रफुल पटेल यांच्या सोबत सर्वश्री सुनील फुंडे, मनीष कापगते, उमेश गोडसे लताताई द्रुगकर, भूमलाताई कुंभरे, ज्ञानेश्वर लोधिकार, जयाताई भुरे, भूमिताताई धकाते, अमोल हलमारे, प्रेम गहाणे, मनोहर भुरे, हेमकृष्ण वाडीभस्मे, प्रकाश मेश्राम, विद्याताई भुरे, निताराम सोनवाने, नंदलाल राऊत, बापूदास पंधरे, उपराज बोपचे सहित मोठ्या संख्येने महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें