
“स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” पोषण जनजागृती आणि वेलनेस समुपदेशन करण्यात येईल-डॉ पुरुषोत्तम पटले

जिला प्रतिनिधि, गोंदिया
गोंदिया (14 सप्टेंबर):
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या विशेष उपक्रमाचा उद्देश महिलांचे आरोग्य मजबूत करून कुटुंब सशक्त बनविणे तसेच व्यापक वैद्यकीय सेवा व जनजागृती कार्यक्रम राबविणे हा आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पाटले यांनी माहिती दिली की या अभियानात महिलांसह किशोरवयीन मुली व बालकांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य तपासण्या, पोषण जनजागृती आणि वेलनेस समुपदेशन करण्यात येईल. 
आरोग्य सेवा शिबिरे – गोंदिया जिल्ह्यात
उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग (तोंड, स्तन व गर्भाशय मुख) तपासण्या क्षयरोग तपासणी, विशेषतः असुरक्षित महिलांमध्ये नोडल अधिकारी डॉ. बी. डी. जायसवाल (आरएमओ) : किशोरवयीन मुली व महिलांसाठी रक्तक्षय तपासणी व समुपदेशन होणार आहे.
आदिवासी बहुल भागात सिकलसेल तपासणी
गर्भवती महिलांसाठी अँटेनटल तपासण्या, पोषण मार्गदर्शन व एमसीपी कार्ड वाटप
बालकांचे लसीकरण शिबिरांमधून उपलब्ध करून दिले जाईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी सांगितले.
जनजागृती व पोहोच उपक्रम बाबत
डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले की, वैद्यकीय सेवांसोबतच जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबविले जातील. त्यात मध्ये विशेषतः 
किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी स्वच्छता व पोषण मार्गदर्शन
तेल व साखरेचे सेवन कमी करण्याबाबत प्रचार
पोषण व वेलनेस समुपदेशन
रक्तदान शिबिरे सुद्धा आयोजित करण्यात आली आहे असे डॉ सुवर्णा हुबेकर यांनी सांगितले.
पीएम-जय व आयुष्मान वय वंदना कार्ड वितरण
क्षयरोग रुग्णांना मदत करण्यासाठी निक्षय मित्र स्वयंसेवक होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, “अशा अभियानांमुळे महिलांचे आरोग्य अधिक मजबूत होते आणि त्यामुळे कुटुंबेही अधिक सशक्त व सक्षम होतात.”
(“ग्रामीण क्षमता” न्यूज यूट्यूब चैनल अवश्य देखें)
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें










